• 0253 - 6055795
  • +91 9822 325 795

Blog

खरंच, देखते रह जाओगे…

मटा’च्या ग्रुमिंग वर्कशॉपला उर्त्स्फूत प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

समारंभ, नोकरी किंवा कालेजमध्ये जाताना आपल्याकडे सर्वांचे लक्ष जावे, असे प्रत्येक महिलेला वाटते. प्रत्येक टप्प्यावर प्रेझेंटबल कसे राहावे, याच्या टीप्स आज देखते रह जाओगे या मोफत ग्रुमिंग वर्कशॉपमध्ये मिळाल्याने महिलावर्ग जाम खूश होता. नाशिकरोड येथील ऋतुरंगमध्ये ‘मटा’तर्फे झालेल्या या वर्कशॉपमध्ये नेहा खरे यांनी प्रात्यक्षिकांसह या बहुमोल टिप्स दिल्या.

नाशिकरोडला पहिल्यांदाच असे वर्कशॉप होत असल्याने महिलांबरोबरच कालेज युवतींनीही गर्दी केली होती. डेली मेकअप, पार्टी मेकअप, विवाहाचा मेकअप, बाडी लॅंग्वेज, कास्च्युम, क्विक हेअरस्टाईल आदींबाबत नेहा खरे यांनी टिप्स दिल्याने प्रत्येकीचा आत्मविश्वास चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

प्रेझेंटेबल राहण्याकडे कल

चार्मिंग आणि प्रेझेंटेबल राहण्याकडे महिलांचा कल वाढल्याचे सांगून नेहा खरे म्हणाल्या की, स्कीन केअर, कास्च्युम कसा असावा याबाबत अलर्टनेस वाढला आहे. आय शॅडो, लिपस्टीकचा कलर दिवसा कोणता असावा, रात्री कोणता असावा, याबाबत कनफ्यूजन आहे. स्वतःच्या ग्रुमिंगबाबत बहुतांशजणी गोंधळलेल्या दिसतात. छान दिसावे असे महिलांना वाटते. त्यांच्याकडे किट आहे, कास्च्युम आहे पण काय करावे, कसे करावे हेच उमगत नाही. डे केअर मेकअप कोणता करावा, लग्न कार्यात कोणता मेकअप करावा, त्वचेची काळजी कशी घ्यावी, कमीत कमी वेळात आफिससाठी कसे तयार व्हावे याचे प्रॅक्टिकल नालेज या वर्कशॉपमधून दिले जाते.

वर्कशॉपमधील टिप्स

बॉडीसाठी मॉइश्चरचा वापर करावा. विवाहितांनी मेकअप करताना माईश्चरायझर्सचा वापर जास्त करावा. चेहऱ्याला प्रायमर लाऊनच मेकअप करावा.

सनस्क्रीन नियमित वापरावे.

केसांसाठी माईल्ड शॅम्पू यूज करावा.

दिवसाला सौम्य कलरचे लीपस्टीक आणि आय शॅडो वापरावा. दिवसा डार्क रेड, पिंक रेड लीपस्टीक टाळावी.

मेकअप काढण्यासाठी मेकअप रिमूव्हरचा वापर करावा.

पावसाळ्यात मस्करा यूज करू नये. सिंपल मेकअप करावा.

केसांचा प्रॉपर कट करावा. बाहेर जाताना केसांना सिरम लावावे. आयर्न किंवा ड्रायर वापरण्यापूर्वी केसांना सिरम लावल्यास केसांची हानी होत नाही.

केस सेट करण्यासाठी हेअर स्प्रे, हेअर जेल वापरू शकता. ………………………..

माझा लूक चेंज झाल्यामुळे एकदम कान्फिडंट झाले आहे. या मेकअपमुळे पूर्ण लूक चेंज होतो, हे आज पहिल्यांदाच जाणवले. नेहा खरे आणि मटाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत.

– स्मिता आहेर

वंडरफूल एव्हढेच शब्द माझ्याकडे आहेत. स्वप्नातही विचार केला नाही अशी सुंदर आणि आकर्षक अशी माझी हेअरस्टाईल झाली. असे वर्कशाप वेळोवेळी अरेंज करावेत, असे सुचवावे वाटते.

– शिवानी वाडकर

‘मटा’ आयोजित नेहा खरेंचा सेमिनार खूपच अप्रतिम वाटला. मी रोज फक्त पाच मिनिटात छान तयार होऊ शकते, हे आज मनोमन उमगले. माय गाड, माझा माझ्यावरच विश्वासत बसत नाहीये.

– सोनल वारे

रियली व्हेरी इनोव्हेटीव्ह वर्कशॉप. खूप सखोल माहिती मिळाली. हा वर्कशाप म्हणजे आयुष्यात जतन करून ठेवावा असा प्रसंग आहे. इतरांनाही या वर्कशॉपचा लाभ घ्यावा.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik/grooming-workshop/articleshow/38937685.cms

2 thoughts on “खरंच, देखते रह जाओगे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *