• 0253 - 6055795
  • +91 9822 325 795

Blog

सख्यांना मिळाला सुंदरतेचा कानमंत्र

म . टा . प्रतिनिधी , नाशिक

आजच्या ट्रेंडी जमान्यात सुंदर दिसण्यासाठी सर्वच महिलांचे प्रयत्न सुरू असतात . चेह-यापासून नखांपर्यंत आपली सुंदरता कशी वाढवता येईल याचा विचार करणा-या महिला बाजारातील अनेक महागड्या सौंदर्य प्रसाधनांना प्राधान्य देतात . परंतु ‘ महाराष्ट्र टाइम्स ‘ च्या ‘ गोडवा संक्रांतीचा ‘ या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी घरच्या घरी नखांची आणि त्वचेची काळजी कशी घ्यावी याच्या टिप्स मिळविल्या .

ब्युटी एक्सपर्ट नेहा खरे यांनी ‘ आयएमए ‘ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले . नेल आर्ट चांगल्या प्रकारे करण्यासाठी मॅनिक्युअर करणे आवश्यक आहे असे सांगत मॅनिक्युअरचे विविध प्रकार त्यांनी सांगितले . शॅम्पू आणि डेटॉल थोड्या गरम पाण्यामध्ये मिसळून त्यामध्या हात १० मिनिटे बुडवून ठेवावेत , त्यानंतर नखांची स्वच्छता करुनच नेल आर्ट करावे असे त्यांनी सांगितले . नेल आर्टचे प्रात्यक्षिकही त्यांनी दाखवले . घरच्या घरी पॅराफिन मॅनिक्युअर , ऑईल मॅनिक्युअर करण्याची पध्दतही त्यांनी दाखवली . कोणत्याही कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी नेल आर्ट करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला . त्वचेची काळजी कशी घ्यावी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले . गव्हाचा कोंडा , मिल्क पावडर आणि हायड्रोजन पॅरॉक्साईड , तांदळाचे पीठ , हळद आणि दही यांच्यापासून घरच्या घरी फेस पॅक कसे तयार करायचे याचीही माहिती यावेळी देण्यात आली . त्वचेवरील टॅनिंग काढण्यासाठी त्वचेला पंचामृत लावण्याचा सल्ला त्यांनी दिला . त्वचेमध्ये रुक्षपणा अधिक असल्यास त्वचेला चमक आणण्यासाठी एक लवंग , दोन – तीन काळे मिरे , दालचिनी बारीक करुन ते दह्यामध्ये मिसळून लावावे असेही त्या म्हणाल्या .. त्वचा चांगली ठेवण्यासाठी हे घरगुती उपचार नियमितपणे करण्याचा सल्ला त्यांनी दिला . यावेळी महिलांना हळदीकुंकू देऊन आयुर्वेदिक हेअर फूड पॅक लुटण्यात आला . यावेळी केशरचना स्पर्धाही घेण्यात आली .

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik/-/articleshow/18079751.cms?

One thought on “सख्यांना मिळाला सुंदरतेचा कानमंत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *